नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सन्मान

नेसरी येथील एस. एस. हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायस्कूल  येथे दर्पणदिनाचे औचित्य साधून चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, संस्थापक अनिल धुपदाळे यांंचा प्रशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशालेला सदिच्छा भेट दिली. 

        प्रारंभी प्रास्ताविक एस. जे. कालकूंद्रीकर यांनी केले. नंदकुमार ढेरे यांनी यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन भारतीय वृत्तपत्र सृष्टीची माहीती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी नंदकुमार ढेरे यांचे स्वागत पर्यवेक्षक ए. डी. लोहार व अनिल धुपदाळे यांचे स्वागत एस. जे. बुगडे यांनी केली. कार्यक्रमाला  एस. एच. पाटील, ए. बी. कोरे, बी. बी. भोईसर, जाधव मॅडम, बागवान मॅडम, एस. जे. कालकुंद्रीकर, श्री. जामुने, व्हि. बी. कोळी, श्री. पुजारी, श्री. देसाई, श्री. आंबीटकर आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. जे. कालकूंद्रीकर यांनी केले तर आभार वाय. व्ही. तरवाळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment