समृदध जैवविविधतेचे रक्षण करणे हीआपली जबाबदारी - प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

समृदध जैवविविधतेचे रक्षण करणे हीआपली जबाबदारी - प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              प्राणिशास्त्राचा अभ्यास सध्या व्यापक प्रमाणावर सुरू आहे. विदयार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे याच हेतूने प्रात्यक्षिके आयोजित केलेली असतात दैनंदिन जीवनातील प्राणिसृष्टीचे उपयुक्तता मूल्य जाणून घेतले तर पर्यावरण समतोलाचा विधायक विचार लक्षात येवू शकतो. समृदध जैवविविधतेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी डोळस दृष्टीकोनातून अभ्यास करून उपयोजित प्राणिशास्त्रातील वाढत्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे" असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. 

         ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रदर्शनात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. एस. के. सावंत हे होते. प्रा. एस. के. सावंत यानी अलिकडच्या काळात जीवसृष्टीचा दुरूपयोग होत असल्याने अनेक दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जनजागृतीसाठी प्रबोधनाची गरज विषद केली. समन्वयक प्रा. डॉ. के. एन निकम यांनी कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे प्रात्यक्षिके न झाल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष ज्ञानाला वंचित झाले. त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे आणि त्यांच्या जाणिवांच्या कक्षा विस्तृत व्हाव्यात याच हेतूने प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे सांगितले.  प्रा. मयुरी कांडर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेखा कोळी यांनी सूत्रसंचालन केले. कु. श्रीयोग मांद्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनास प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती घेतली.

No comments:

Post a Comment