शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीत हलकर्णी महाविद्यालयाचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीत हलकर्णी महाविद्यालयाचे यश

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते. 

          शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रुपये प्रमाणे एकूण २०००० /- रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सानिया निसार देसाई, संदीप वैजनाथ मिलके, सोनाली गोपाळ गडकरी, ऋषिकेश धाकलू घोळसे या विद्यार्थ्यांचा सहभाग असून दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव. विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष. संजय पाटील, सचिव. विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, समिती प्रमुख प्रा. मधुकर जाधव, नॅक समिती प्रमुख डॉ. आय. आर. जरळी, प्रा. ए. व्ही. नौकुडकर, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, नंदकुमार बोकडे, युवराज रोड, संदीप पाटील व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment