कविता विद्यार्थ्याच्या ओठावर फुलली पाहिजे - शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, कार्वेत बरसल्या छोटयांच्या काव्यधारा - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

कविता विद्यार्थ्याच्या ओठावर फुलली पाहिजे - शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, कार्वेत बरसल्या छोटयांच्या काव्यधारा

मराठी अध्यापक संघ चंदगड कडून आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धातील यशस्वी विद्यार्थी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        पूर्वी गुरुजी पाठयपुस्तकातील कवितांना सुंदर चाली लावून मुलांकडून मुखोद्गत करून घ्यायचे. त्यामुळे मुलांच्यात कवितेविषयी आवड निर्माण व्हायची. मुलांना लिहिते करून त्यांना छोटया छोटया विषयांवर कविता तयार करायला लावले पाहिजे.  कविता विद्यार्थ्याच्या ओठावर फुलली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी केले.

            मराठी अध्यापक संघ व साहित्य रत्न चंदगड यांनी आयोजित केलेल्या चंदगड तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून एम.टी. कांबळे बोलत होते. 

यावेळी त्यांनी जुन्या कवितांचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम . गावडे होते. प्रास्ताविक एम.एन. शिवणगेकर यांनी केले. यावेळी अनंत पाटील , एम.एम. तुपारे,प्रा.एन.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

काव्यवाचन स्पर्धेत लहान गटात अनुक्रमे 

आर्या संजय साबळे ( महात्मा फुले विद्यालय कारवे), दिया प्रशांत बसर्गेकर ( कुमार विद्यामंदिर बसर्गे ), श्रावणी पांडूरंग  पाटील (महात्मा फुले विद्यालय कारवे ), श्रेया दयानंद पाटील (कुमार विद्यामंदिर बसर्गे ).

तर मोठ्या गटात

अनूजा दत्तात्रय  लोहार (नरसिंह हायस्कूल निट्टूर), वृषाली अपूल झेंडे (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड), शुभम भैरू गावडे (भावेश्वरी विद्यालय नांदवडे)सानिका शिवराज हसूरे, (धनंजय विद्यालय नागनवाडी), स्वरा सचिन शिरगावकर (धनंजय विद्यालय नागनवाडी) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजयी विद्यार्थांना शालेय उपयोगी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कवी जयवंत जाधव, प्रमोद चांदेकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला पांडूरंग पाटील, अॅड.  राहुल पाटील, प्राचार्य आर. आय. पाटील, एस .एल. बेळगावकर , एम. व्ही.कानूरकर, शाहू पाटील, सचिन शिरगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एन. पाटील तर आभार संजय साबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment