हेब्बाळ क|| नूल येथे भाजपा युवा मोर्चा शाखा उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2022

हेब्बाळ क|| नूल येथे भाजपा युवा मोर्चा शाखा उद्घाटन

भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य व‌ माथाडी कामगार नेते शिवाजीराव पाटील उपस्थितीत हेब्बाळ क||नूल येथे भाजपा युवा मोर्चा शाखा शुभारंभ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          हेब्बाळ क||नूल येथे भाजपा युवा मोर्चा शाखा उद्घाटन भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य व‌ माथाडी कामगार नेते शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजीराव पाटील यानी  युवकांमध्यये असणारी ऊर्जा देशाच्या नवनिर्मितीसाठी वापरत एक नवा भारत निर्माण करण्याची ताकद आजच्या युवकांच्यामध्ये आहे. युवा ऊर्जेचा वापर समाजाच्या विकासासाठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचे साांगितले

                 यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज यादव, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, भाजपा किसान संघ जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, पंचायत समिती सदस्या सौ.जयश्री तेली, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष  एल टी नवलाज, भाजपा गडहिंग्लज अध्यक्ष  विठ्ठल पाटील आदीसह युवा मोर्चाचे   पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment