संतांनी मानवतावादाची गुढी उभारली - शिवाजीराव पाटील, जगद्गुरू सोमेश्वर शिवाचार्य स्वामींचे घेतले आशिर्वाद - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2022

संतांनी मानवतावादाची गुढी उभारली - शिवाजीराव पाटील, जगद्गुरू सोमेश्वर शिवाचार्य स्वामींचे घेतले आशिर्वाद

नुल (ता. गडहिंग्लज) येथे सुरगीश्वर मठाच्या श्री सिद्धेश्वर मठ (रामपूरवाडी) या मठाच्या वास्तुशांती प्रसंगी धर्मसभेत रंभापुरी पीठाचे जगद्गुरू डॉ. प्रसन्न रेणुकवीर सोमेश्वर शिवाचार्य स्वामींचे आशिर्वाद घेताना शिवाजीराव पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे. या आदर्शामुळे आपल्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. संतांनी मानवतावादाची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. रंभापुरी पीठाचे जगद्गुरू डॉ. प्रसन्न रेणुकवीर सोमेश्वर शिवाचार्य स्वामींचे आशिर्वाद लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान मानतो व यातून समाजकार्याची नवी प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य व‌ माथाडी कामगार नेते  शिवाजीराव पाटील यांनी केले.

       ते नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाच्या श्री सिद्धेश्वर मठ (रामपूरवाडी) या मठाच्या वास्तुशांती कळसारोहण प्राणप्रतिष्ठापणा कळसारोहन अशा संयुक्त कार्यक्रमानिमित्त आयोजीत धर्मसभेत ते बोलत होते. यागंगाधर स्वामी यांनी वेदपठन व प्रार्थना म्हटली. विनोद नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत रेपनपेटे, सरपंच प्रियंका यादव, उमेश खोत, श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह विविध स्वामीजींचे आशीर्वचन झाले. रंभापुरी जगद्गुरूंच्या सानिध्यात रामपूरवाडी शाखामठ, गुरु सिद्धेश्वर मठ कळसारोहन व मुर्ती प्रतिष्ठापना, हनुमान मंदिराच्या कळसारोहन कार्यक्रम उत्साहात झाला. सुरगीश्वर मठातील लिंगैक्य चंद्रशेखर महास्वामी ध्यानमंदिराचे लोकार्पणही यावेळी झाले. 

        याप्रसंगी श्री रामनाथ गिरी समाधीमठ, मिठ संस्थान बेळगाव, हुक्केरी मठ शिरकोल, हिरेमठ संस्थान बेळंकी, उगड़ी, कारंजीमठ, खानापूर, हिटणी, संगोळ्ळी आदी मठांचे मठाधीश उपस्थित होते. क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेले आप्पासाहेब कोळी (सर्कल गडहिंग्लज), विलास कातकर (तलाठी नूल), नागेश पाटील (नूल), महादेव दोरूगडे (नूल), ॲड. संजय देसाई, सौ. करूणा हिरेमठ (बेळगाव), उमेश खोत, सचिन शिंदे, रामचंद्र यरकदावर यांचा सत्कार झाला. संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. आमदार राजेश पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, अशोक स्वामी, अनिता सोमगोंडा आरबोळे, चौगुले, बाबासाहेब पाटील, जयसिंग चव्हाण, जितेंद्र शिंदे, प्रविण शिंदे, कल्लाप्पा नडगदल्ली, रामगोंडा पाटील, विलासराव आजरी, बसवराज कुलकर्णी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment