गुडेवाडी हायस्कूलच्या पाटील यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेत - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

गुडेवाडी हायस्कूलच्या पाटील यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेत

एल. पी. पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच शालेय शिक्षण विभाग व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 'नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२' मध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी (ता. चंदगड) येथील अध्यापक एल. पी. पाटील यांच्या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

         श्री. पाटील यांचे मूळ गाव कडलगे खुर्द, ता चंदगड हे असून एक विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून ते तालुक्यात परिचित आहेत. त्यांनी तयार केलेल्या गणित विषयातील 'दैनंदिन पट, लिहू झटपट' या नवोपक्रमाचा जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक आला होता त्याच्यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यानिमित्त विद्यालयातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. एल. पी. पाटील यांची सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment