उमगाव (ता. चंदगड) येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण शुभारंभप्रसंगी भरमु अण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांचेसह मान्यवर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या उमगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी व्यक्त केले. उमगाव पैकी धुरीवाडा (ता. चंदगड) येथे जिल्हा परिषद सदस्य सचिन सदानंद बल्लाळ यांच्या फंडातून मंजूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक सटूप्पा पेडणेकर यांनी केले. यावेळी बोलताना शिवाजीराव पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून परिसराच्या विकासात आपण कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी आर. जी. पाटील ( सरपंच धुमडेवाडी), संजय गावडे सरपंच खालसा कोळींद्रे, रुक्माणा गावडे उपसरपंच उमगाव, तुकाराम बेनके बसर्गे यांचेसह ग्रामस्थ ज्ञानेश्वर गावडे, प्रकाश धुरी, दिगंबर धुरी, गंगाराम रेडकर, जानबा गावडे, तानाजी पेडणेकर, रामभाऊ धुरी आदींची उपस्थिती होती. संतोष गावडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment