चंदगडमध्ये शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात, शिक्षक समितीचे सहकार्य - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

चंदगडमध्ये शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात, शिक्षक समितीचे सहकार्य

 

पंचायत समिती चंदगड प्रश्नपत्रिका प्रकाशन करताना सभापती अनंत कांबळे सोबत शिक्षक समिती पदाधिकारी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
चंदगड तालुक्यात १९ केंद्रांवर पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) व १९ केंद्रांवर उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) च्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात पार पडल्या. इ. ८ वी ८४४ तर इ. ५ वी च्या १२४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
हलकर्णी केंद्रावर भेटीप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुभेदार, सोबत धनाजी पाटील व शिक्षक

    परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व समता शिक्षक परिषद शाखा चंदगड यांच्या सौजन्याने देण्यात आल्या. याबद्दल दोन्ही संघटनांचे पंचायत समिती चंदगडचे सभापती ॲड अनंत कांबळे व गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांनी अभिनंदन केले. 
श्रीराम विद्यालय कोवाड इ. ८ वी केंद्रावर अनंत पाटील यांचेकडून प्रश्नपत्रिका स्वीकारताना केंद्रसंचालक श्रीकांत वै पाटील, केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, एस एन पाटील आदी

  शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच, शैक्षणिक काम करतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून शिक्षक समितीने इयत्ता पाचवी व आठवी च्या मार्गदर्शक शिक्षकांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तसेच मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी सराव चाचणी पुरवठा करून राबवलेला उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय आहे. असे उद्गार सभापती कांबळे यांनी प्रश्नपत्रिका प्रकाशन वेळी काढले.   यावेळी अशा चाचण्या यापुढेही घेण्याचा मानस अध्यक्ष श्री धनाजी पाटील यांनी व्यक्त करताना संघटनेच्या सभासदांनी या उपक्रमासाठी १ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी  सरचिटणीस एन व्ही पाटील यांनी  शिक्षक समितीने सामाजिक बांधिलकीतून पूरग्रस्तांना मदत, कोविड काळात ऑक्सिजन जनरेटर, कोविड लस, ऍम्ब्युलन्स, बांद्राई येथील अपघातग्रस्तांना  मदत आदी समाजाभिमुख कामे केल्याचे सांगितले.
मा गटशिक्षणाधिकारी सौ सुभेदार व शिक्षण विस्ताराधिकारी एम टी कांबळे यांनी विविध केंद्रांवर भेटी देऊन समाधान व्यक्त केले.
      याकामी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, बाबुराव परीट, वैजनाथ अष्टेकर, ए के पाटील, आण्णापा वांद्रे, प्रकाश बोकडे, प्रवीण साळुंखे, जोतिबा बामणे, गोविंद चांदेकर, हंबीरराव कदम, मधूकर कोकितकर, राज्यनेते शंकर मनवाडकर, सदानंद गावडे, रियाज शेख, देवदास भालबर, रोहिदास पाटील, जोतिबा नाकाडी, विजय कांबळे, ईश्वर पाटील, प्रल्हाद गावडे, महिला प्रतिनिधी मीना लोबो, श्रद्धा संभाजीचे, शितल पाटील, रंजिता देसुरकर, शितल कुरणे, संगीता जळगेकर, गोकाककर, स्वाती भगत, सौ बोरगुले, मधुमती गावस, शिल्पा तुर्केवाडकरशांताराम मोरे, डी टी कांबळे, उत्तम भोसले, राजू जोशी, विनायक कांबळे, सुभाष चोगले, प्रकाश पाटील, विश्वनाथ गावडे, शशिकांत सुतार, प्रशांत पाटील, अशोक बेनके, बळवंत लोंढे, विलास शं पाटील, मोहन नाईक, विनायक गिरी, जोतिबा पाटील, सुनील कुंभार, सुभाष सावंत, मनोज बुच्चे, रामचंद्र तुप्पट, बोरगुले, शंकर पाटील, यशवंत कांबळे, शिवाजी बिर्जे, शंकर कोरी, मारुती चिंचणगी, आदींचे सहकार्य तर वाय के चौधरी, जी बी जगताप, बाळू प्रधान, सुधीर मुतकेकर आदी केंद्रप्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment