अथर्व दौलतची १५ डिसेंबर २०२१ पर्यतची ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

अथर्व दौलतची १५ डिसेंबर २०२१ पर्यतची ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा

दौलत कारखान्याचे छायाचित्र

चंदगड/प्रतिनिधी
       हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लि लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ या तिसरा गळीत हंगामात गाळप झालल्या ऊसाची बीले व तोडणी वहातुक बीले शेेतकर्याच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
अथर्व-दौलतने   यावर्षी एफ. आर. पी. निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे. टन रु २९०१ / - प्रमाणे दर जाहिर करुन वेळेत अदा केलेला आहे. यावर्षी सुरुवातीपासून ते ३० नोव्हेंबर २०२१  अखेर कारखान्यास १४५३८३  मे. टन इतका ऊस आलेला आहे. या ऊसाचे ४२१७.५४  लाख रुपये इतके बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केले आहे. तसेच तोडणी व वाहतुक बिलेही जमा करणेत आलेली आहेत. १डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ६२६०७  मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल १८१६.२२  लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खाती नुकतेच जमा केलेले आहेत तसेच याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत. कारखान्याने १५ डिसेंबर २०२१ अखेर एकूण २०७९८९  मे. टनाचे ६०४३.७६ लाख रुपये इतके बिल आजअखेर शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केले असून याबरोबर तोडणी वाहतुक कंत्राटदाराचीही सर्व बिले अदा केली आहेत अशी माहिती अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
        यावर्षी कारखाना उत्पादन क्षमता वाढ केली असून कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सूरु आहे. ऊसाला चांगला दर वेळेत बिले व शेती खातेचे तोडणी वाहतुकचे योग्य नियोजन तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यास वेळेत आणलेमूळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. श्री. खोराटे यांनी पुढील वर्षी पासून ऊस विकास अनुषंगाने कारखाना माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबविणेचा मनोदय व्यक्त केला आहे. सध्या कारखान्याकडे अल्प दरात उत्कृष्ट प्रतीचे कंपोष्ट खतही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचा ऊस शेतीसाठी चांगला उपयोग होणार असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. कारखान्याने सुरुवातीपासून आजअखेर सर्व बिले व व्यवहार पारदर्शक ठेवल्यामूळे कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकरी व तोडणी वाहतुक यंत्रणेस कारखान्याबददल विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. सदरचा अवकाळी पावसामूळे कारखान्याचा गळीत हंगाम पुढे कांही दिवस लाबणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील व नजिकचा ऊस गाळपास घेणार आहे . त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही चिंता दूर झालेली आहे. कारखान्यास चांगला व ताजा ऊस शेतकरी बंधुनी देवून सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे. यावेळी कारखाना संचालक पृथ्वीराज खोराटे, विजय पाटील व कारखान्याचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.No comments:

Post a Comment