कन्या समृधी योजनेतून तारेवाडी येथे सामाजिक वनीकरणकडून सागवान वृक्ष भेट - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

कन्या समृधी योजनेतून तारेवाडी येथे सामाजिक वनीकरणकडून सागवान वृक्ष भेट

कन्या समृधी योजनेतून तारेवाडी येथे सामाजिक वनीकरणकडून सागवान वृक्ष भेट देताना  डॉ. सागर पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत सामाजिक परिक्षेत्र गडहिंग्लज मार्फत मौजे तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे सन २०२१ वर्षात जन्मलेल्या मुलींच्या पालकांना सागवान रोपे भेट देण्यात आली.

    या वृक्षामुळे २० / २२ वर्षानंतर मुलींचा शैक्षणिक तसेच विवाह खर्च सहज शक्य होईल. त्याबरोबरच निसर्गात वृक्ष संख्या  वाढून पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे विचार यावेळी बोलताना सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजचे प्रभारी वनक्षेत्रपाल डॉ. सागर पाटील यानी व्यक्त केले. यावेळी वनसेवक बसवराज कुरबेट्टी, वनसेवक मनोज पाटोळे, ग्रामसेविका श्रीमती मेटील, सरपंच युवराज पाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment