नेसरी येथे विद्याधर गुरबे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

नेसरी येथे विद्याधर गुरबे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

नेसरी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना विद्याधर गुरबे आणि मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

   नेसरी  (ता. गडहिंग्लज) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  सतेज उर्फ बंटी डी. पाटील  व  आमदार  जयंत आसगावकर  (आमदार, पुणे शिक्षक पदवीधर मतदार संघ) यांच्या फंडातून नेसरी येथील सुंदर नगर अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण रस्ता करणे १० लाख रुपये व नेसरी सुंदर नगर वसाहती मध्ये दलित वस्ती सुधारणा मधून डांबरीकरण करणे साठी ५ लाख रुपये असा भरगोस निधी मंजूर करून या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे  व  सौ. इंदुमती नाईक  यांच्या हस्ते करण्यात आला.      

       प्रास्तविक श्री. वाईंगडे यांनी केले. उपस्थित नेसरी गावचे सरपंच  आशिषकुमार साखरे, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र परीट, रणजित पाटील, नागोजी कांबळे, सौ. पद्मजा  देसाई, सौं. गीता बुरूड, रत्नप्रभा कोलेकर, कार्तिक कोलेकर, प्रकाश बुरूड, शंकर नाईक, नागेश दळवी, प्रसाद करमळकर, गुरूनाथ चव्हाण, पुंडलिक चव्हाण, रमेश दळवी, उमेश दळवी, एस. एन. राजगोळकर आदि मान्यवर ग्राम पंचायत कर्मचारी अशोक गुरव, सोमनाथ तेली  भैरू कांबळे उपस्थित होते.

          यावेळी विद्याधर गुरबे बोलताना म्हणाले की, ``नेसरीसाठी जास्तीत जास्त शासनाचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच इतर कामासाठीही पालकमंत्री  सतेज पाटील  यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देवून नेसरीचा विकास साधणार असल्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment