चंदगड येथील उत्कर्ष राजा गणेश मंडळाच्या सभामंडपासाठी नगरसेवक दिलीप चंदगडकर यांची ग्रामविकास मंत्र्याच्याकडे निधीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2022

चंदगड येथील उत्कर्ष राजा गणेश मंडळाच्या सभामंडपासाठी नगरसेवक दिलीप चंदगडकर यांची ग्रामविकास मंत्र्याच्याकडे निधीची मागणी

चंदगड येेथील उत्कर्ष राजा गणेश मंडळच्या सभामंडपासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना नगरसेवक दिलीप चंदगडकर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील उत्कर्ष राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मंदिरासाठी सभामंडपासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी चंदगड नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप चंदगडकर यानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         नवीन वसाहतीमधील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये उत्कर्ष राजा गणेश मंडळ मार्फत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. तसेच या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. तसेच येथेच गणेश मंदिरही आहे. या गणेश मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे मंडळाला कार्यक्रम करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस या पासून निवारा होण्यासाठी सभा मंडपाची आवश्यकता आहे. सभामंडप बांधकाम करण्यासाठी मंडळाकडे जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे या सभामंडपासाठी शासकीय स्तरावर आपल्या माध्यमातून निधी मंजूर करून मिळावा अशी मागणी नगरसेवक श्री. चंदगडकर यानी मंत्री श्री. मुश्रीफ यांचेकडे निवेदनातून केली आहे.

No comments:

Post a Comment