चंदगड व कोवाड परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2022

चंदगड व कोवाड परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा

 

सकाळच्या सत्रात शहरासह परिसरात रिमझिम पाऊस झाला.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 चंदगड शहरासह तालुक्‍यात आज सकाळी नऊच्या  सुमारास पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सध्या स्थितीत रब्बी हंगामातील पिकावर याचा परिणाम होत आहे.  कोवाड परिसरात मसूरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.  अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे मोठा फटका बसत आहे. रविवारी सकाळी दहा मिनिटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. तसेच दोन दिवसापासून अधूनमधून ढगाळ वातावरण व ऊनही पडत आहे. या वातावरणामुळे रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना चिंता लागून आहे.

No comments:

Post a Comment