शासनाच्या आधारभूत नाचणी खरेदी केंद्राचा आज शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2022

शासनाच्या आधारभूत नाचणी खरेदी केंद्राचा आज शुभारंभ

 


चंदगड -सी .एल. वृत्तसेवा

 शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत नाचणी खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दु.१ वा.चंदगड येथे तहसील कार्यालयात माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

तहसीलदार विनोद रणवरे,जि.प. सदस्य सचिन बल्लाळ,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार,असून यावेळी माजी सभापती शांताराम पाटील  बबनराव देसाई, यशवंत सोनार,उपसभापती सौ.मनिषा शिवनगेकर, गडहिंग्लज मार्केट कमिटीचे अध्यक्ष अभय देसाई व प्रमुख पदाधिकारी यांवेळी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला शेतकर्यानी  उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड तालुका कृषिमाल फलोत्पादन संघाचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यानी केले आहे.No comments:

Post a Comment