काळजीवाहू डोस लसीकरण मोहिम शनिवार पासुन सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2022

काळजीवाहू डोस लसीकरण मोहिम शनिवार पासुन सूरू

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड आरोग्य विभागा मार्फत काळजीवाहू डोस (Precaution Dose) ची लसीकरण मोहिम शनिवार दिनांक २२/०१/२०२२ रोजी चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय चंदगड या ठिकाणी सकाळी १०-०० वाजता ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत आयोजित केले असल्याची माहिती माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ अरविंद पठाणे यानी केले आहे.

                चंदगड तालुक्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर,सर्व शासकिय विभागातील फ्रंटलाईन अधिकारी ,कर्मचारी तसेच ६० वर्षा वरील सर्व व्याधीग्रस्त नागरिक यांना हा काळजीवाहू डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतील पात्र सर्वानी लसीकरण करुन घ्यावे असे अहवान आरोग्य विभाग पंचायत समिती  चंदगड यांचे मार्फत करण्यात आलेले आहे.सदरची लसीकरण मोहिम दि १० जानेवारी पासून सुरु झालेली असून यापुढेही नियमित दररोज सुरु रहाणार आहे . तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व चंदगड ग्रामिण रुग्णालय येथे देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे .त्यामुळे सर्वानी हा डोस घ्यावा असे आवाहन डॉ सूर्यकांत कांबळे यानी केले आहे.




No comments:

Post a Comment