वेगळ्या धाटणीतला 'पोलीस पाटील, तानाजी कुरळे', कोणत्या गावातील आहे हे.......वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2022

वेगळ्या धाटणीतला 'पोलीस पाटील, तानाजी कुरळे', कोणत्या गावातील आहे हे.......वाचा......

गडहिंग्लज येथे तानाजी कुरळे यांचा सन्मान करताना अनिस व राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी.


गडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा
          चन्नेकुपी (ता. गडहिंग्लज) येथील 'पोलीस पाटील' तानाजी कुरळे एक वेगळ्या धाटणीतला माणूस. महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस संविधानिक दृष्ट्या साक्षर झाले पाहिजेत, यासाठी अखंड धडपड करणारा अवलिया!
    कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रात येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी पाचही जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे 'पोलीस पाटील आणि भारतीय संविधान' या विषयावर व्याख्यानाद्वारे प्रबोधन करण्याचा लक्षवेधी उपक्रम  तानाजी रामचंद्र कुरळे यांनी पूर्ण केला आहे. संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस कोरोना महामारी मुळे सध्या थांबला असला तरी तो पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात ठासून भरली आहे. 
        कोरोना महामारी कमी होताच राज्यभरातील पोलीस पाटलांना संविधान साक्षर करण्याचा उपक्रम ते पुढे नेणार आहेत. नजीकच्या काळात ते कोकण व मराठवाडा परिक्षेत्रात या विषयावर प्रबोधन करणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील पार पडलेल्या त्यांच्या प्रबोधन कार्यक्रमाची दखल घेऊन 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती  व राष्ट्रसेवा दल शाखा गडहिंग्लज यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते कार्यकत्यांच्या उपस्थितीत त्यांचा गडहिंग्लज येथे सन्मान करण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment