चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेताना विद्यार्थ्यी व प्राध्यापक. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने २५ जानेवारी २०२२ हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व एन. एस. एसच्या स्वयंसेवकांना प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील यानी शपथ दिली.
प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले, ``१८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अनिवार्य आहे. मतदान ही एक पवित्र प्रक्रिया आहे. ती पार पाडण्यासाठी प्रत्येक युवकाने प्रयत्न करने जरुरीचे आहे. यासाठी प्रथम मतदान नोंदणी करा. मतदार हा विकला जाऊ नये, प्रत्येकाचे मत हे अनमोल आहे, त्याचे पावित्र्य जपून त्याचा उपयोग सत्कारणी लागावा, आपण घेतलेल्या शपथेतील मुलभुत तत्वे तंतोतंत पाळावीत व लोकशाही बळकट करण्यासाठी योग्य व शिक्षित उमेदवार निवडला जावा याची सर्वानी खबरदारी घ्यावी, असे मत प्राचार्य डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी पथनाट्य सादर केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यात निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, रांगोळी, चित्रकला, माइम, पथनाट्य इ. विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना तहसीलदार विनोद रणवरे व प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. स्वयंसेवकांनी तहसीलदार कार्यालय, बाजारपेठ, बस स्टॉप, संभाजी चौक, नगरपंचायत, चंदगड अशा विविध ठिकाणी पथनाट्य सादरीकरण केले. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगावा व प्लास्टिक मुक्तीचा संदेश ही दिला. याद्वारे महाविद्यालय, चंदगड तालुका तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचे प्रबोधन केले गेले. यावेळी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा ए. डी. कांबळे यांनी केले. प्रा. आर. व्ही. आजरेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment