जंगमहट्टी येथे किड व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करताना प्रकाश गुरव व इतर मान्यवर.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे जंगमहट्टी (ता. चंदगड) येथे काजू फळपिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काजू फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती मोहीम कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रकाश गुरव यांनी काजूवरील प्रमुख किडींची ओळख, त्यांचा जीवनक्रम व त्यांचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी अक्षय गार्डे यांनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळखत युनिट, नाडेप युनिट या घटकांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन कृषी पर्यवेक्षक खंडू साबळे यांनी केले होते. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावणे, कृषी सहाय्यक शुभम पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment