कार्वे येथे प्राथमिक शिक्षक विरंगुळा केंद्र पायाभरणी प्रसंगी उपस्थित शिक्षक, शिक्षिका. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कार्यालय तथा विरंगुळा केंद्राच्या इमारतीचा पाया भरणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सन्मित्र कॉलनी मजरे कारवे येथे उभारण्यात येणाऱ्या कार्यालय तथा विरंगुळा केंद्राच्यापायाभरणी प्रसंगी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्तीनंतरच्या काळातील अनेक प्रलंबित कामे तसेच उर्वरित आयुष्य आनंदात घालवता यावे. यासाठी कार्यालय व सभागृह सह इमारतीची उभारणी करण्यात येत आहे. इमारतीच्या उभारणीनंतर सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित कामे संघटना पातळीवरून लवकरात लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे अशी माहिती अध्यक्ष, सचिव व कार्यकारणीच्या वतीने सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment