तूर्केवाडी येथील अभियंता अशिष सबनीस यांचा अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

तूर्केवाडी येथील अभियंता अशिष सबनीस यांचा अपघाती मृत्यू

 

अशिष  अनिरुद्ध सबनीस

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

पुणे येथे कामावरून घरी जात असताना जखमी झालेल्या तरुण अभियंत्यावर बेळगाव येथे उपचार सुरू असताना  गुरुवार दि. 27 रोजी मृत्यू झाला. अशिष  अनिरुद्ध सबनीस (वय 35, तूर्केवाडी, ता. चंदगड) असे मृत तरुण अभियंत्याचे नाव आहे. 31 डिसेंबर 21 रोजी सदर अपघात पुणे येथे झाला होता. 24 जानेवारी पासून बेळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते मेकॅनिक इंजिनियर म्हणून चार महिन्यापूर्वी  पुणे येथे एका कंपनीत रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. चन्नम्मानगर (बेळगाव) येथील प्रकाश होम इंडस्ट्रीजचे सीनियर अकाउंटंट अनिरुद्ध सबनीस यांचा तो मुलगा तर बेळगाव येथील पत्रकार अक्षय सबनीस यांचे ते चुलत बंधू होत.
No comments:

Post a Comment