बिबट्याचा वावराबाबत सूचना देताना पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर
चंदगड / प्रतिनिधी
यशवंतनगर- तुर्केवाडी येथे बिबट्याचा वावर आसलेल्या परिसरात काल पासून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्भूमीवर आज (शुक्रवार दि. २८ जानेवारी रोजी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. ए तळेकर यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी करून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
काल गुरुवारी रात्री आठच्या सुमारास यशवंतनगर येथील फास्कल फर्नांडिस यांच्या घराबाहेर बिबट्या निदर्शनास आला होता. तर त्या आधी याच परिसरातील चव्हाण मळा, पाटील आणि उपसरपंच अरुण पवार यांच्या शेतात वाघाचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या ठस्यांवरून हा पट्टेरी वाघ असल्याचा अंदाज असून परिसरात वाघाचा वावर आणि अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले. काल हाच बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पो. नि. तळेकर यांनी केले. तसेच घटनास्थळी जात बिबट्याच्या पायांचे ठसे तसेच परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आसपासच्या नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, कोणत्याही प्रकारचा धोका वाटल्यास तात्काळ पोलीस प्रशासन तसेच वन विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना नागरिकांना केल्या. तर वन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून जर आज पुन्हा वाघाचा वावर आढळून आल्यास उद्या पिंजरा लावून त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जातील असे सांगितले.यावेळी वन विभागाचे प्रकाश शिंदे, मेघराज हुले, कदम तसेच पोलीस कर्मचारी संदीप कांबळे, तुर्केवाडी गावचे सरपंच रुद्रप्पा तेली, उपसरपंच अरुण पवार, पोलीस पाटील माधुरी कांबळे, यशवंतनगर ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment