हल्लारवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत डाॅ. मनोहर पाटील सहाव्यांदा विजयी - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

हल्लारवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत डाॅ. मनोहर पाटील सहाव्यांदा विजयी

डाॅ. मनोहर पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत डॉ. मनोहर महादेव पाटील यांनी १२० मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा २२ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला. 

विजयानंतर हात उंचावून दाखविताना डाॅ. मनोहर पाटील

      सलग सहावेळा ग्रामपंचायतीत निवडूण येण्याचा मान मिळवला आहे. डॉ. मनोहर पाटील यांनी ग्रामीण भागात राहून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना केवळ वैद्यकिय व्यवसायातून सेवाभावी वृत्ती जपत कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. १९९७ पासून त्यांनी गाव पातळीवर काम करत ग्रामपंचायत निवडणूकीला सामोरे गेले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सलग सहा वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कोणत्याही पक्षाची मदत न घेता केवळ सामान्य जनतेच्या विश्वासावर निवडणून येण्याचा पराक्रम केला आहे. त्यामध्ये त्यांनी १५ वर्षे सरपंचपद तसेच दत्त सेवा संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. २००३ साली हलकर्णी पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. केवळ जनतेच्या पाठींब्यावर त्यांनी आजपर्यंत आपली राजकीय कारकिर्द भक्कम केली आहे. 

             निवडणूकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून यापुढेही काम करणार असून त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही. यापुढेही गोर-गरिब जनताच केंद्रस्थानी मानून त्यांच्या हितासाठी अविरत कार्य करत राहीन अशी ग्वाही यावेळी डॉ. मनोहर पाटील यांनी दिली.



No comments:

Post a Comment