नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्याशी गप्पा मारताना सेट स्टिफन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सेंट स्टिफन इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड येथील विषय शिक्षक- रोहन रमेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी एका उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमा अंतर्गत चंदगड शहरातील नगराध्यक्षा- सौ. प्राची काणेकर तसेच विविध प्रभागातील नगरसेविकांना विद्यार्थ्यांनी भेटी देत त्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये सौ. प्रमिला गावडे, सौ. संजीवनी चंदगडकर, सौ. माधुरी कुंभार, सौ. अनिता परीट, सौ. अनुसया दाणी, सौ. संजना कोकरेकर, सौ. नेत्रदीपा कांबळे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
नगराध्यक्षा तसेच नगर सेविकांच्या कामकाजाचे नियोजन कसे चालते. आर्थिक पुरवठा कशा प्रकारे होतो. नागरिकांच्या हितासाठी कोणते उपक्रम आहेत. आरोग्यविषयक काळजी कशी घेतली जाते, कचरा व्यवस्थापन कसे होते. तसेच भविष्यातील योजनांविषयी विद्यार्थ्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. कोरोनाचे नियम पाळत योग्य ती काळजी घेत विद्यार्थ्यांनी गटवार मुलखातीचे नियोजन पार पाडले. ,"स्वानुभूतीवर आधारित हा उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते ," असे मत विषय शिक्षक- रोहन यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment