शैक्षणिक उठावातंर्गत विंझणे शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

शैक्षणिक उठावातंर्गत विंझणे शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

रंगरंगोटी केलेल्या विंझणे शाळेच्या भिंती,

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थाईक झालेले ग्रामस्थ, शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शिवजीदादा चव्हाण यांच्या विशेष पुढाकाराने प्राथमिक शाळेला शैक्षणिक उठावार्तगंत १ लाख ४० हजार रुपये आर्थिक मदत केली.शााळेला  रंगरांगोटी करून भिंतीवरती नेत्यांची तैलचित्रे व वर्गनिहाय शैक्षणिक सुविचार लेखन करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. या उपक्रमासाठी अप्पाराव चवरे, सुहास शेंडे, तानाजी पवार, तुकाराम शेंडे, दत्तू विंझनेकर, शिवाजी निकम, बाबू विंझनेकर, पांडुरंग निकम, अप्पासाहेब गिलबिले, अंकुश कांबळे, संजय नाईक तसेच मुख्याध्यापक तुकाराम कदम, निवृत्ती तिबिले, विठ्ठल पिटुक आदीनी याकामी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment