हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेला अनंतराव कुलकर्णी यांच्या कडुन संगणक स्विकारताना गुंडू तुडयेकर, सरपंच राहूल पाटील, उपसरपंच सुतार आदी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला उद्योजक अनंतराव कुलकर्णी यानी प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून संगणक भेट दिला. यावेळी शाळेचा ध्वजारोहण अनंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.सरपंच राहूल गावडा, उपसरपंच रमेश सुतार व केंद्रप्रमुख यशवंत चौधरी यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. कु.अक्षता ल्हासे, व कु. वैष्णवी नेसरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
माजी सरपंच एकनाथ कांबळे, पोलिस पाटील अंकूश गुरव, संभाजी सुभेदार, लक्ष्मण आवडण, अशोक बेनके, ग्रा.प.सदस्य यासह अंगणवाडी आणि आशा सेविका मदतनीस व ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थिती होते. सूत्रसंचालन मलिक शेख केले. अध्यक्ष गुंडूराव तुडयेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment