शिवाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने सानिया मुंगारेचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

शिवाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने सानिया मुंगारेचा सत्कार

पतसंस्थेच्या वतीने सानियाचा सत्कार करताना मान्यवर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         दिल्ली येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कला उत्सवात शास्त्रीय  गायन स्पर्धेत देशात प्रथम  आलेल्या शिवनगे (ता. चंदगड) येथील कु. सानिया धनाजी मुंगारे हिचा व वडिल धनाजी मुंगारे यांचा हलकर्णी फाटा येथील शिवाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष अविनाश  पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य आर. आय. पाटील यांनी सानिया मुंगारे व तिचे वडिल धनाजी मुंगारे यांच्या  कार्याचा परिचय करून दिला. यावेळी  उपाध्यक्ष आण्णापा गोरल,  संचालक  विलास पाटील, महादेव शिवनगेकर, शिवाजी पाटील, मारुती  पाटील, संदिप गिलबिले, संजय पाटील, गावडु पाटील यांसह कर्मचारी होते. आभार व्यवस्थापाक दिपक माने यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment