भोगोली येथे हत्तींकडून शेतकऱ्यांच्या दोन एकरातील पिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2022

भोगोली येथे हत्तींकडून शेतकऱ्यांच्या दोन एकरातील पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील भोगोली हे गाव वनखात्याच्या क्षेत्रा लगतच वसलेले असून वन्य प्राण्यांच्यामुळे वेळोवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शुक्रवारी ऊस तोडणीला आलेल्या ऊसात हत्तींच्या कळपाने धुडघूस घातला. त्यामुळे हातातोंडाला आलेले पिक भुईसपाट झाले आहे. 

हत्तीने भुईसपाट केलेले ऊसपिक

        भोगोली गावातील अनिल गावडे, शिवाजी गावडे, वसंत गावडे, अनंत खोत व शामबा सलाम या शेतकऱ्यांचे दोन एकर क्षेत्र ऊस, नारळाची बाग, केळीची बाग हत्तीने फस्त केले आहेत. वनविभागाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी. तसेच हत्तींच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

No comments:

Post a Comment