| प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे राजीनामे सादर करताना संचालक. | 
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या मनमानी कारभारास कंटाळून आज (शुक्रवारी) १२ संचालकांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. अध्यक्षानी संचालक मंडळाची रितसर सभा न बोलवता साखर विक्रीचे टेंडर मागविले आहे. ही साखर विक्री थांबवण्याची मागणी केली आहे.
राजीनामे देणाऱ्या संचालकात डॉ. प्रकाश शहापूरकर, विद्याधर गुरबे, प्रकाश चव्हाण, सतिश पाटील, दिपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, क्रांतीदेवी कुराडे, जयश्री पाटील यांचा समावेश आहे. अध्यक्ष हे संचालक मंडळास विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असून संचालक मंडळाची रितसर सभा न बोलवता साखर विक्रीची टेंडर मागविले आहे. त्यामुळेच १२ संचालकांनी अध्यक्षांच्या मनमानी कारभारास कंटाळून संचालक पदाचे राजीनामा देत असल्याचे संयुक्त पत्रकात म्हटले आहे. २२ जानेवारीला होणारी साखर विक्री थांबवावी अशी मागणी ही केली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment