गोरगरीब जनतेमुळेच राजकारणातील स्थान अबाधीत - भरमुआण्णा पाटील, बसर्गे येथे कार्यकर्त्यांनी साजरा केला ८६ वा वाढदिवस - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2022

गोरगरीब जनतेमुळेच राजकारणातील स्थान अबाधीत - भरमुआण्णा पाटील, बसर्गे येथे कार्यकर्त्यांनी साजरा केला ८६ वा वाढदिवस

बसर्गे ता.चंदगड येथे वाढदिवसानिमित्त माजी मंत्री भरमु आण्णा पाटील यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केक कापून साजरा केला. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारण केल्यामुळेच गोरगरीब जनतेने जवळ केले. आपला नेता मानले. आज पर्यंतच्या निवडणुकीत एकही पैसा खर्च न करता जनतेनेच निवडुन दिले. आमदार, नामदार केले. म्हणून जनतेनं गेली पाच दशकं राजकारणात एकही पैसा खर्च न करू देता आजतागायत माझं राजकिय स्थान अबाधीत ठेवलं असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केले.  

बसर्गे (ता. चंदगड) येथे वाढदिवसानिमित्त माजी मंत्री भरमु आण्णा पाटील यांचा सत्कार करताना आम. राजेश पाटील, बाजूला उदयकूमार देशपांडे, तुकाराम बेनके, मोहन परब आदी

         बसर्गे (ता. चंदगड) येथे ८७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच तुकाराम कांबळे होते. प्रारंभी प्रास्ताविक शाहु पाटील यानी केले. भरमुआण्णा पुढे म्हणाले , ``विकासासाठी गटतट बाजुला ठेवुन विरोधकांनाही जवळ केले. त्यामुळेच गडहिंग्लज उपविभागातील पाच कारखान्याना उस पूरेल इतका पाणीसाठा केला. अनेक विकासाच्या योजना राबविल्या. त्यामुळेच शेवटच्या श्वासापर्यंत जनातेची सेवा करणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भरमुआण्णाचा सपत्नीक सत्कार केला.  

वाढदिवसानिमित्त आण्णांचा शुभेच्छा देताना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ.

       यावेळी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदार संघातील विकासात भरमुआण्णा पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान जनता विसरणार नाही. आम्ही चंदगड मतदार संघात अनेक विकासकामे खेचून आणली. पण भरमुआण्णा पाटील कै. नरसिंगराव पाटील, कै. बाबासाहेब कुप्पेकर यांनी मतदार संघात अनेक लहान-मोठे पाणी प्रकल्प आणून मतदार संघ खऱ्या अर्थाने जलसमृद्ध केल्याचे सांगितले.

         यावेळी जि. प. सचिन बल्लाळ, माजी सभापती शांताराम पाटील, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, अनिल शिवणगेकर, एस. एस. तुर्केवाडकर, धनाजी पाटील, सरपंच आर. जी. पाटील, अशोक कदम, नेहा पाटील आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.

      यावेळी शामराव बेनके, गोकुळचे माजी संचालक दिपकदादा पाटील, माजी सभापती ज्योतीताई पाटील, पं स सदस्य बबनराव देसाई, मोहन परब, उदयकूमार देशपांडे, मळवीकर, नंदकुमार ढेरे, ॲड. विजय कडूकर, डाॅ. परशराम पाटील, नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील, तानाजी गडकरी, अंकुश गवस, दिलीप पाटील, तानाजी कागणकर, सुरेश सातवणेकर, गुरूनाथ बल्लाळ, टी. एस. चांदेकर, भीमराव चिमणे, बाबू परीट, प्रशांत पाटील, तुकाराम बेनके, मारुती कुट्रे, पुंडलिक वरपे, अरुण चिगरे, तातोबा पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले. आभार तुकाराम कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment