चंदगड येथील एस. पी. क्रिकेटअकॅडमीने आयोजीत केलेल्या "चंदगड बिग बॅश लीग" या स्पर्धेतील ध्रृव इलेव्हन संघाने बक्षिस वितरण करताना नगरसेवक अभिजीत गुरबे, अनंत पाटील आदी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर एस. पी. क्रिकेट अकॅडमीने आयोजीत केलेल्या "चंदगड बिग बॅश लीग" या स्पर्धेत ध्रृव इलेव्हन संघाने विजेतेपदासह रोख ३१ हजार रूपयांचे बक्षिस मिळवले.
या स्पर्धेमधे " प्रृथ्वी इलेव्हन, ध्रृव इलेव्हन, युवा स्पोर्ट्स, दत्तसाई तुडीये, एस. पी. अकॅडमी, टीम पार्ले, फ्रेंड्स गृप, बारबोंडा इलेव्हन हलकर्णी या आठ संघाची भाग घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम सामना"ध्रृव इलेव्हन विरूध्द दत्तसाई तुडीये" ह्या दोन संघात झाला. यामध्ये अनंत पाटील यांच्या ध्रृव इलेव्हन संघाने सुहास पाटील यांच्या दत्तसाई संघाचा पराभव करत "चंदगड बिग बॅश 2022" करंडक आपल्या नावे केला. विजेत्या संघाला संदीप आर्दाळकर गणेश ऑटोमोबाइल्स यांचेकडून रोख रक्कम 31000 व करंडक व उपविजेत्याला 21000/-व करंडक देण्यात आले. उत्कृष्ठ बाॅलर म्हणून ध्रृव इलेव्हन संघाचा कल्पेश सडाके, तर मालिकावीर ध्रृव इलेव्हन संघाचा मुजमील बावगी यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण नगरसेवक अभिजीत गुरबे व कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अनंत पाटील उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर गावडे, तेजस गुरव, अजय तहसिलदार, चंदु ओऊळकर,अनिकेत पाटील यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment