`हॉटेल प्रणाम`च्या लकी ड्रा योजनेचे पाचही मानकरी चंदगड तालुक्यातीलच, कोण आहे हे भाग्यवान विजेते, वाचा........... - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2022

`हॉटेल प्रणाम`च्या लकी ड्रा योजनेचे पाचही मानकरी चंदगड तालुक्यातीलच, कोण आहे हे भाग्यवान विजेते, वाचा...........

हॉटेल प्रणाम`च्या लकी ड्रा योजनेतील मोबाईलचे इझमाम नाईक यांना बक्षिस देताना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, शेजारी मालक लक्ष्मण गावडे, नगरसेवक प्रमिला गावडे व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       गेल्या दिड महिन्यापासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असलेल्या चंदगड शहरातील `हॉटेल प्रणाम`च्या वतीने आयोजित लकी ड्रा ची बुधवारी दुपारी सोडत काढण्यात आली. पाच भाग्यवान विजेते निवडायचे होते. नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लकी ड्रा सोहळा संपन्न झाला. पाच लहान मुलांच्या हस्ते गठ्यातील तिकीट काढून विजेते घोषीत करण्यात आले. पाचही विजेते हे चंदगड तालुक्यातील आहेत. 

         `हॉटेल प्रणाम` मध्ये येणाऱ्या १०० रुपयांवरील बिलावर एक कुपन दिले जात होते. पहिल्या क्रमांकासाठी – ज्युपीटर दुचाकी, दुसऱ्या क्रमांकासाठी – वाशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी – एलईडी टीव्ही, चतुर्थ क्रमांकासाठी – मोबाईल व पाचव्या क्रमांकासाठी मोबाईल अशी बक्षिसे होती. सोडत दुपारी असली तरी आपल्याला बक्षिस लागेल या उत्सुकतेने तालुक्यासह अन्य तालुक्यातूनही लोक चंदगडमधील `हॉटेल प्रणाम` मध्ये आले होते. दुपारी नगराध्यक्षा सौ. काणेकर यांच्या उपस्थितीत सोडतीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. पहिल्यांदा पाचव्या क्रमांकाच्या बक्षिसाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या तर सर्वात शेवटी पहिल्या क्रमांकाचे बक्षिसांची सोडत काढण्यात आली. 

बक्षिस व विजेते खालीलप्रमाणे 

१) प्रथम क्रमांक – टीव्हीएस ज्युपीटर दुचाकी – रिझवान मुल्ला, चंदगड

२) द्वीतीय क्रमांक – वाशिंग मशीन – स्वप्नील बा. सावंत – मु. सावतवाडी, पो. उमगाव

३) तृतीय क्रमांक – एलईडी टीव्ही – शिवानी दिलीप पाटील – धुमडेवाडी

४) चतुर्थ क्रमांक – मोबाईल – फातीमा एस. शहा – चंदगड

५) पाचवा क्रमांक – मोबाईल – इझमाम नाईक – चंदगड

`हॉटेल प्रणाम`च्या पहिल्या लकी ड्रा स्पर्धेचे वरील पाच भाग्यवान विजेते आहेत. 

         सोडतीनंतर `हॉटेल प्रणाम`चे मालक लक्ष्मण गावडे यांनी `गेल्या दिड महिन्यापासून आम्ही ग्राहक केंद्रस्थानी मानून सेवा दिली आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम ठेवत ग्राहकांच्या खिशाला परवडेल असे दर ठेवले आहेत. `हॉटेल प्रणाम`च्या सुरवातीपासून ग्राहकांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे. अशाच प्रतिसाद देवून ग्राहकांनी `हॉटेल प्रणाम`वरील विश्वास आणखी दृढ करुन सेवा करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.` 

      नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर म्हणाल्या, चंदगड शहराची गरज ओळखून `हॉटेल प्रणाम`चे मालक लक्ष्मण गावडे यांनी चंदगड शहरामध्ये मोठ्या शहाराच्या प्रमाणे चंदगडमध्ये हॉटेल सुरु करुन खवय्यांची सोय केली आहे. त्यांच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांची चव उत्तम असल्याने चंदगडकरांनी त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले. 

      यावेळी नगराध्यक्ष सौ. प्रमिला गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी परशराम गावडे, डॉ. पाटील, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, संस्थापक अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, संपत पाटील, चेतन शेरेगार, तातोबा गावडा, प्रकाश एनापुरे यांच्यासह हॉटेलचे कर्मचारी व `हॉटेल प्रणाम`च्या लकी ड्रा योजनेत सहभागी झालेले ग्राहक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment