ढोलगरवाडी : क्रीडा साहित्य भेट स्वरूपात देताना अभियंता किसन पवार. शेजारी अन्य मान्यवर. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील माजी विद्यार्थी व मुंबई येथील अभियंता किसन राजाराम पवार यांनी ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला विविध क्रीडा साहित्य भेट स्वरूपात दिले. मुख्याध्यापक ए. एन. येळूरकर यांच्याकडे पवार यांनी साहित्य प्रदान केले. यामध्ये बॅट बॉलचे दोन संच, भाला दोन संच, थाळी, उंच उडीच्या दोऱ्या व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह अन्य साहित्य भेट स्वरूपात दिले.
तत्पूर्वी कॉलेज आवारात मांडेदुर्ग येथील निवृत्त सचिव जोतिबा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शेतकरी शिक्षण मंडळाच्या संचालिका शांता बाबुराव टक्केकर, धानबा कदम, सरपंच सरिता तूपारे, सर्पमित्र सदाशिव पाटील, संदीप टककेकर, माजी सरपंच गावडू पाटील, कल्लाप्पा पाटील, माजी पोलीस पाटील विजय नौकुडकर, निवृत्त गटविकास अधिकारी विलास कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment