अथर्व-दौलतची ३१ डिंसेबर पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2022

अथर्व-दौलतची ३१ डिंसेबर पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

               हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा.लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२  या तिस-या गळीत हंगामा गाळप केलल्या ऊसाची ३१डिंसेबर पर्यतची बिले  शेतकऱ्यांंच्या खात्यावर जमा केल्याची माहीती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.

           कार्यक्षेत्रातील व संलग्न कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंद केलेला ऊस गळीतासाठी येत आहे . कारखाना यावर्षी एफ.आर.पी निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे. टन रु. २९०१/- प्रमाणे दर जाहिर करुन वेळेत अदा केलेला आहे . यावर्षी सुरुवातीपासून ते १५ डिसेंबर 2021 अखेर कारखान्यास२०७९८९ मे . टन इतका ऊस आलेला आहे . या ऊसाचे ६०३३.७६ लाख रुपये इतके बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केले आहे. तसेच तोडणी व वाहतुक बिलेही जमा करणेत आलेली आहेत.

           १५ डिसेंबर ते३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ६३४१३  मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल १८३९.६४  लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकतेच जमा केलेले आहेत. याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत. कारखान्याने ३१ डिसेंबर २०२१ अखेर एकूण २७१४०२ मे. टनाचे ७८७३.४० लाख रुपये इतके बिल आजअखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहेत. याबरोबर तोडणी वाहतुक कंत्राटदाराचीही सर्व बिले अदा केली असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.                            कारखान्याचे उत्कृष्ट प्रतीचे कंपोष्ट खत निर्मिती केली असून साधारणतः २००० मे. टन कंपोष्टची विक्री झाली आहे. या खताचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये चांगला अनुभव मिळाला आहे. कंपोष्ट खत कारखाना साईटवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्यांनी नजिकच्या कारखाना कार्यालयात मागणीची नोंदणी करावी.

No comments:

Post a Comment