चंदगड वनविभागाच्या वतीने जखमी रानडुक्करला दिले जीवदान.......सभापती ॲड. कांबळे दिली माहीती... - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2022

चंदगड वनविभागाच्या वतीने जखमी रानडुक्करला दिले जीवदान.......सभापती ॲड. कांबळे दिली माहीती...

जखमी रानडुक्कराला उपचारासाठी नेताना चंदगड वनविभागाचे कर्मचारी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड शहरात चंदगड बस स्टॅन्डच्या पाठीमागे घराच्या शेजारी जंगलातील रानडुक्कर आल्याची घटना सभापती ॲड. अनंत कांबळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जखमी अवस्थेतील रानडुक्कर गावात आल्याचे सांगितले. वनविभागाने त्याची दखल घेऊन तात्काळ पिंजरा लावून जखमी अवस्थेतील रानडुक्कर अथक  परिश्रमाने ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. त्यानंतर त्याच्यावर उपचार केले.

        त्याचबरोबर आरोग्य विभागाकडे पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार केले. रानडुक्कराला शासकीय वाहनातून वनक्षेत्रपाल कार्यालय चंदगड येथे आणून पुन्हा पशुवैद्यकीय अधिकारी चंदगड यांच्याकडून उपचार करून घेतले. हे रानडुक्कर जखमी असल्याने ते बरे होईपर्यंत त्यांच्यावर उपचार करुन त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत. 

         माणसाचीही घेणार नाही एवढी आपुलकी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी  रानडुकरावर दाखवून उपचार करून काळजी घेतली. सदर कारवाई वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डी. जी. पाटील (वनपाल चंदगड), ए. डी. वाजे (वनपाल कानुर खुर्द), सागर पोवार (वनरक्षक, चंदगड) खंडू कातखडे (वनरक्षक सुळये), कैलास सानप (वनरक्षक मिरवेल), नितीन नाईक (वनसेवक चंदगड), वाहन चालक ईश्वर घुले  यांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment