कालकुंद्री वाचनालयाच्या भेटीला पंढरपुरातून लेखक, वाचनालयाच्या वतीने सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2022

कालकुंद्री वाचनालयाच्या भेटीला पंढरपुरातून लेखक, वाचनालयाच्या वतीने सत्कार

लेखक गाजरे यांचे स्वागत करताना व्ही. आर. पाटील सोबत वाचनालयाचे पदाधिकारी व वाचक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील लेखक, कथानिवेदक अंकुश गाजरे यांनी नुकतीच भेट दिली.

       हे वाचनालय शासनाचे कोणतेही अनुदान नसताना लोकसहभागातून गेली दहा वर्षे सुरु आहे. येथे वाचनचळवळ वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यांची माहिती  विविध प्रसारमाध्यमांद्वारे पाहून  पंढरपूर येथील कथानिवेदक, लेखक अंकुश  गाजरे यांनी वाचनालयाला भेट दिली. त्यांच्या सोबत आलेले बाबूशेठ पांडकर (सासवड) व गाजरे यांनी वाचनालयाच्या कामकाज व उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. काही पुस्तके वाचनालयाला भेट दिली.

     कला महाविद्यालय कोवाडचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते गाजरे  यांचा व ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी यांच्या हस्ते पांडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष के.जे.पाटील, संचालक पी. एस्. कडोलकर, एस्. के. मुर्डेकर, नारायण गावडू पाटील, तुकाराम गायकवाड, संदीप  नरसू पाटील आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment