शिरोली येथील यल्लापा दोरुगडे यांनी आत्मदहनचा निर्णय घेतला मागे......काय मिळाले आश्वासन...... - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

शिरोली येथील यल्लापा दोरुगडे यांनी आत्मदहनचा निर्णय घेतला मागे......काय मिळाले आश्वासन......


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शिरोली येथील यल्लापा दोरुगडे यांनी मौजे शिरोली,  ता. चंदगड, जि.. कोल्हापूर येथील गट क्र. ३ ही माझी वडीलोपार्जित जमीन सन २००८ मध्ये पाझर तलावासाठी भूसंपादन केलेली आहे. सदर पाझर तलाव शिरोलीचे बांधकाम पूर्ण होऊनही दोरुगडे यांना मोबदला रक्कम मिळाली नसल्याने दोरुगडे व अन्य चार जणांनी २६-०१-२०२२ इ. रोजी ग्रामपंचायत शिरोली, ता. चंदगड येथे किंवा पाझर तलाव शिरोली येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी यांनी माझे मोबदला रक्कम मागणीबाबतचा खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने संपादन करण्याचा प्रारुप निवाडा करुन त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी होणारे आत्मदहन आंदोलन मागे घेत असल्याची माहीती यल्लापा दोरुगडे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून दिली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी चंदगडचे पोलिस निरिक्षक यांनी दिले आहे. 

No comments:

Post a Comment