चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील यर्तेनहटटी (ता. चंदगड) येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. यामध्ये तब्बल १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेले असून चंदगड तालुक्यासह सीमाभागातील १४ आरोपींवरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, ``यर्तेनहटटी (ता.चंदगड) येथे बसवानी आपान्ना सनदी यांच्या घरी बेकायदेशीर पणे तीन पानी पत्याचा जुगार विना परवाना सुरू असलेच्या खात्रीशीर बातमी खबऱ्या मार्फत चंदगड पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन कारवाईबाबत पुर्व परवानगी घेवुन या ठिकाणी लक्ष ठेवत सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार साहित्यासह रोख रक्कम आणि इतर असा एकूण १ लाख ४३ हजार ५३० रुपये किमतीचा मुददेमाल छापा कारवाई जप्त करण्यात आला. तर या गुन्ह्यात सहभागी आरोपी हे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या प्रकरणी १४ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment