दरवाजा तोडून अज्ञाताकडून ६५ हजारांची धाडसी चोरी, कोठे झाली चोरी.......वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

दरवाजा तोडून अज्ञाताकडून ६५ हजारांची धाडसी चोरी, कोठे झाली चोरी.......वाचा........


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             इनाम कोळिंद्रे (ता. चंदगड) येथे सोमवारी (दि. २४ रोजी) रात्री घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटय़ाने घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह ६५ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. याबाबतची फिर्याद  सुवर्णा अनिल तारळेकर (वय ४५ वर्षे, रा. इनाम कोंळीद्रे ता. चंदगड) यांनी चंदगड पोलिसात  दिली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याने तारळेकर यांच्या घराचा पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी व त्यांच्या जाऊ माधुरी मधुकर तारळेकर यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास पो. हे. काॅ महेश बांबळे करत आहेत.

No comments:

Post a Comment