कुमार विद्यामंदिरचा विद्यार्थी विपुल कडूकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश, राज्य गुणवत्ता यादीत पटकावले स्थान - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2022

कुमार विद्यामंदिरचा विद्यार्थी विपुल कडूकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश, राज्य गुणवत्ता यादीत पटकावले स्थान

विपुल कडुकर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील कुमार विद्यामंदिरचा विद्यार्थी विपुल विजय कडूकर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. त्याने 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

        त्याला मार्गदर्शक शिक्षक हरिशचंद्र कोळी, मुख्याध्यापक एकनाथ मष्णू चौकुळकर यांचे मार्गदर्शन तर राजाराम तुकाराम जोशी, विनायक बाबू प्रधान, विजय गारुती कांबळे, नंदू पांडुरंग गावडे, संतोष पाडुरंग घवाळे यांचे प्रोत्साहन लाभले. 

No comments:

Post a Comment