सांबरे येथील पुरूष व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धांना मोठा प्रतिसाद, सासवड पुणे संघ प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2022

सांबरे येथील पुरूष व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धांना मोठा प्रतिसाद, सासवड पुणे संघ प्रथम

सांबरे येथील प्रथम क्रमांक प्राप्त पुणे सासवडच्या संघाला बक्षिस वितरण करताना एन.डी. कांबळे सी .एल. न्यूज प्रतिनिधी एस. के. पाटील, पत्रकार विनायक पाटील 

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

        श्री कलमेश्वर क्रीडा मंडळ सांबरे (ता. गडहिंग्लज) आयोजित कै. किरण पाटील (आर्मी) यांच्या स्मरणार्थ पुरूष वजनी गट व निमंत्रीत महिला कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात ४२ किलो वजनी गटात सासवड पूणेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

             विद्या मंदिर सांबरेच्या क्रीडांगणावर सर्व कोविड नियमांचे पालन करत या स्पर्धांचे उदघाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अभय अडकुरकर, अंजनाताई रेडेकर, तानाजी गडकरी, केडीसी संचालक संतोष पाटील, मुन्नासो नाईकवाडी, जोतिबा भिकले आदि मान्यवरानी उपस्थिती लावली  होती.


स्पर्धातील विजयी संघ

 *निमंत्रित महिला गट.* 

 1 )  हिंदवी कौलव 

2 )व्ही के चव्हाण कॉलेज कार्वे

3 ) देसुर कबड्डी संघ देसूर 


 *42 किलो वजनी गट* 

 1 ) सासवड पुणे

2 ) राष्ट्रसेवा कुरुंदवाड 

3 ) आर्दाळ कबड्डी संघ आर्दाळ

 

 *52 किलो वजनी गट* 

1 )कौलगे कबड्डी संघ  कौल गे 

2 ) पुंगाव शिरगाव 

3 ) मुड शिंगी कबड्डी मुड शिंगी


 *70 किलो वजनी गट* 

1 )आप्पी पाटिल फौडेशन महागाव 

2 )राजगोळी कबड्डी संघ रजगोळी 

3 ) गुडाळेश्वर गुडाळ

या विजयी संघाना पुढीलप्रमाणे रोख बक्षिसे व चषक देण्यात आली .

 

*महिला गट* 

अनुक्रमे ७००० , ५००० , ३००० , २००० हजार रुपये व चषक


 *७० किलो वजनी पुरूष* 

अनुक्रमे  १५००० , १०००० , ७००० हजार रुपये व चषक


*_५२ किलो- पुरूष_* 

अनुक्रमे ७००० , ५००० , ३००० हजार रूपये व चषक 


 *४२ किलो  पुरुष* 

अनुक्रमे ५००० , ३००० , २००० हजार रुपये व चषक 

याबरोबरच उत्कृष्ठ चढाई व पकडीसाठी चषक व देण्यात आली .

      यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एन. के. पाटील, अध्यक्ष महादेव वाईंगडे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, खजिनदार संकेत वाईंगडे, दिपक शिंदे व केराप्पा पाटील, मधुकर नाईक, सुभाष टिक्का यांनी नियोजन केले.

No comments:

Post a Comment