चंदगड तालुक्यात ऑनलाईन शिक्षण परिषद उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2022

चंदगड तालुक्यात ऑनलाईन शिक्षण परिषद उत्साहात

पंचायत समिती चंदगड


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुका स्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषद आज दि. १३ जानेवारी रोजी संपन्न झाली. या शिक्षण परिषदेस प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख व चार शिक्षकांना गणित, इंग्रजी व भाषा पेटी, रीड टू मी सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा, १०० दिवस वाचन अभियान या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.

          गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांनी स्वागत करून शैक्षणिक उद्बोधन केले. प्रास्ताविक तालुका संपर्क अधिकारी वैशाली पाटील (अधिव्याख्याता डाएट कोल्हापूर) यांनी केले. यावेळी गणित पेटी बाबत महंतेश खोत व दयानंद पवार यांनी, इंग्रजी पेटी बाबत विजय कुमार बामणे व मलिकरेहान शेख यांनी, भाषा पेटी बाबत डी. टी. कांबळे यांनी, रीड टू मी सॉफ्टवेअर बाबत अनिकेत म्हैसाळे या शिक्षकांनी, शंभर दिवस वाचन अभियान बाबत सुनील पाटील विषय तज्ञ बीआरसी चंदगड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बी आर सी विषयतज्ञ महादेव नाईक यांनी केले. भाऊ देसाई यांनी आभार मानले. शिक्षण परिषदेस विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख वाय. के. चौधरी, जी. बी. जगताप, बाळू प्रधान, सुधीर मुतकेकर आदींसह तालुक्यातील ९३ शिक्षकांची उपस्थिती होती.

           या शिक्षण परिषदेत सहभागी  केंद्रप्रमुख व अध्यापक आपापल्या केंद्रातील सर्व शिक्षकांना वरील विषयांचे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती बीआरसी व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment