शाळा सुरू ठेवण्यासाठी नागरदळे येथील पालकांचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2022

शाळा सुरू ठेवण्यासाठी नागरदळे येथील पालकांचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

नागरदळे   : मुख्याध्यापक सुभाष देसाई यांना निवेदन देताना सचिन पाटील, प्रल्‍हाद पाटील, ज्ञानेश्वर देवण, किरण कोकितकर, कृष्णा पाटील आदी.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         १२ जानेवारीपासून शाळा बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र गत दोन वर्षांपासून शाळा बंद- सुरू, बंद- सुरू या प्रकाराने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा स्थितीला गाव पातळीवर कोरोनाचा संसर्ग नसल्याने गावा-गावातील शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. अशी मागणी नागरदळे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने मुख्याध्यापक सुभाष देसाई, गटशिक्षणाधिकारी तसेच सरपंच दिलीप पाटील यांना निवेदनातून केली आहे. निवेदनावर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक सचिन पाटील, प्रल्‍हाद पाटील, ज्ञानेश्वर देवण, किरण कोकितकर, कृष्णा पाटील यांच्यासह अन्य पालकांच्या सह्या आहेत. यांच्या उपस्थितीत सदर निवेदन मुख्याध्यापक यांना देण्यात आले. 

No comments:

Post a Comment