जमिनीच्या मोबदल्यासाठी शिरोली येथील दोरुगडे कुटुंबियांचा आत्महदनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2022

जमिनीच्या मोबदल्यासाठी शिरोली येथील दोरुगडे कुटुंबियांचा आत्महदनाचा इशारा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

शिरोली (ता. चंदगड) येथील यल्लाप्पा सखोबा दोरुगडे व अनंत गुंडू दोरुगडे वारस वगैरे एकूण ११ कुटूंबे आहेत. मौजे शिरोली येथील गट नं. ३ मध्ये भुसंपादन २००८ मध्ये झाले असून  जमिन अधिग्रहन केली गेली आहे. त्यामुळे दोरुगडे कुटुंबीय भुमिहीन झाले आहे. त्यानंतर पाझर तलावाचे बांधकाम पुर्ण होवून बरेच वर्षे झाली. तरीही अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. २६ जानेवारीपर्यंत मोबदला न मिळाल्यास २६ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिरोली  (ता. चंदगड) येथे किंवा पाझर तलाव शिरोली येथे आत्मदहन करण्याचा इशारा दोरुगडे कुटुंबियांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी गडहिंग्लज व चंदगडचे तहसिलदार यांना दिले आहे. निवेदनावर यल्लापा सखोबा दोरुगडे, अनंत गुंडू दोरुगडे, बाळू गुंडू दोरुगडे, बाळू गुंडु दोरुरडे, कृष्णा घोडींबा दोरुगडे यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment