चंदगड, आजरा गडहिंग्लज, बेळगाव, खानापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या बळीराजा काजू दर संघर्ष समितीतर्फे काजू उत्पादकांसाठी रविवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 7:30 वाजता फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, विद्यानंद गावडे यांनी दिली.
कृषी सहायक राजेश देवरुखकर |
महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागातील कृषी सहायक राजेश देवरुखकर हे काजू मोहर व्यवस्थापन या विषयावर फेसबुकद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. चंदगड, आजरा, बेळगाव, खानापूर तालुक्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यानंद गावडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment