चंदगड येथे ८ जानेवारीला ब्लॅकपँथर पक्षाच्या वतीने जातीच्या दाखल्यासाठी कँँम्पचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2022

चंदगड येथे ८ जानेवारीला ब्लॅकपँथर पक्षाच्या वतीने जातीच्या दाखल्यासाठी कँँम्पचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने चंदगड तालुक्यातील नागरिकांसाठी जातीच्या दाखल्यासाठी दिनांक ८ जानेवारी 2022 रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

         चंदगड येथें दिनांक ८ जाने २०२२ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात हे कॅम्प पार पडणार आहे. जातीचे दाखले हवे असणारे नागरिक व काही कागदपत्रांअभावी न मिळणारे जातीचे दाखले, या सर्वासाठी ही मोहीम राबवली असून यावेळी तांत्रिक समस्येचे निराकरण करून जातीचे दाखले दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या कॅम्पला उपस्थित रहावे असे आवाहन ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment