अथर्व- दौलत साखर कारखान्याची १५ जानेवारी २०२२ पर्यतची ऊस व तोडणी वाहतुक बिले जमा - अध्यक्ष मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2022

अथर्व- दौलत साखर कारखान्याची १५ जानेवारी २०२२ पर्यतची ऊस व तोडणी वाहतुक बिले जमा - अध्यक्ष मानसिंग खोराटे

कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ या  तिसऱ्या गळीत हंगामात गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या व तोडणी वाहतुकदार यांची १५जानेवारी पर्यतची ऊस विले संबधित शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यानी दिली.

          सुरु असून कार्यक्षेत्रातील व सलग्न कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंद केलेला ऊस गळीतासाठी येत आहे. कारखाना यावर्षी एफ.आर.पी निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे.टन रु.२९०१/- प्रमाणे दर जाहिर करुन वेळेत अदा केलेला आहे. यावर्षी सुरुवातीपासून ते ३१ डिसेंबर २०२१ अखेर कारखान्यास २७१४०२  मे. टन इतका ऊस आलेला आहे. या ऊसाचे७८३२.४०  लाख रुपये इतके बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केले आहे. तसेच तोडणी व वाहतुक बिलेही जमा करणेत आलेली आहेत. १ जानेवारी ते १५जानेवारी२०२२ या कालावधीत६४१८४  मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल १८६१.९७  लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खाती नुकतेच जमा केलेले आहेत. तसेच याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत. कारखान्याने १५ जानेवारी २०२२ अखेर एकूण ३३५५८६  मे. टनाचे ९६८५.३७  लाख रुपये इतके बिल आजअखेर शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केलेले आहेत. याबरोबर तोडणी वाहतुक कंत्राटदाराचीही सर्व बिले अदा केली आहेत अशी माहिती अथर्व इंटरट्रेड प्रा.लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. 

         यावर्षी व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गाळप करणेचे ठरवले असून साधारणता ६ लाख मे. टन इतके ऊस गाळपाचे उध्दिष्ट ठेवले आहे. मागील गळीत हंगामातील गाळप विचारात घेता यावर्षी कारखान्याने केलेल्या काही मशिनरीचे आधुनिकीकरण व योग्य नियोजन यामूळे कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप केलेले आहे. सदरबाबत कारखाना व्यवस्थापन कारखाना अधिकारी व कर्मचारी याच्या दृष्टीने बाब उल्लेखनिय आहे असे श्री खोराटे यांनी नमूद केले. कारखान्याला ऊस पुरवठा करणारे शेतकरी बंधु तोडणी वाहतुक कंत्राटदार व कामगार यांचे दैनदिन मोलाचे सहकार्य लाभत आहे.



No comments:

Post a Comment