अमळनेरच्या कष्टकरी हमाल मापाड्यांची अल्पशी मदत, कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्रकाराला लाख मोलाची ठरली - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2022

अमळनेरच्या कष्टकरी हमाल मापाड्यांची अल्पशी मदत, कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्रकाराला लाख मोलाची ठरलीअमळनेर / सी. एल. वृत्तसेवा

संत सखाराम महाराज यांची भूमी , पू . साने गुरूजी, श्रीमंत प्रताप शेट यांची कर्मभूमी असलेले अमळनेर गावातील अमळनेर तालुका हमाल मापाडी संघटनेचे नूतन अध्यक्ष रमेशदेव बुधा धनगर यांनी वृतपत्र व समाज माध्यमावरून  कर्करोगाशी झुंज देणाऱ्या नागपूर येथील तरुण पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे यांना आर्थिक मदत करावी यासाठी मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे आवाहन वाचले व  फोन करून शंभर रूपये जमा करतो असे म्हणाले. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी  रमेश देव यांना सांगितले तुम्ही एकटे नका देऊ. दहा हमाल बांधवांकडून प्रत्येकी दहा रुपये जमा करून पाठवा. त्यांनी तसेच केले आणि दहा जणांसोबतचा फोटोही पाठवला . या श्रमिक कष्टकरी बांधवांचे शंभर रूपये लाख मोलाचे आणि पत्रकार मित्र योगेश यांची प्रकृती सुधारण्यासाठी नक्कीच बळ देणारे ठरेल . धन्यवाद रमेश देव आणि त्यांचे सहकारी. या अमळनेरच्या कष्टकरी हमाल बांधवांनी केलेल्या मदतीचा समाज माध्यम व वृत्तपत्रातील वृत्ताचा परिणाम असा झाला की, खान्देशातील बऱ्याच दात्यांचे हात यथाशक्ती मदतीसाठी पुढे सरसावले.
No comments:

Post a Comment