"अथर्व-दौलत साखर कारखान्याचे कमी कालावधीत 5 लाख मे. टनापेक्षा जादा गाळपाचे उदिष्ट पूर्ण - अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2022

"अथर्व-दौलत साखर कारखान्याचे कमी कालावधीत 5 लाख मे. टनापेक्षा जादा गाळपाचे उदिष्ट पूर्ण - अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती

मानसिंग खोराटे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शेतकरी, उत्पादक, तोडणी-ओडणी वाहतुकदार, हितचिंतक व कंपनी व्यवस्थापनाने केलेले गाळपाचे योग्य नियोजन यामुळे हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड दौलत कारखान्याने तिसऱ्या हंगामात अल्पावधीत ५ लाखापेक्षा अधिक गाळप केल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. 

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

                       हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी हा सहकारी तत्वावरील बंद असणारा कारखाना कोल्हापूर जिल्हा बँकेकडून सेक्युटरायझेशन अक्ट 2002 अन्वये 39 वर्षासाठी भाडेतत्वावर चालविणेस घेतला आहे. सन 2019 या कालावधीत कारखाना ताब्यात घेतलेनंतर प्रतिकुल परिस्थितीतही कारखाना चालविणेचा कंपनीकडून प्रयत्न केला गेला या कारखान्यात कांही मशिनरी बदल व नविन मशिनरी बसविणे अपरिहार्य होते. कारखाना कार्यप्रणाली पूर्ण कार्यक्षमतेने व अविरहीतपणे चालविणेसाठी कांही बदल व सुधारणा तांत्रीक सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या गेल्या कंपनीने या कारखान्यात केलेल्या गुंतवणुकीमूळे कारखाना सुरळीतपणे चालण्यास मदत झाली आहे. 

            याचा परिपाक म्हणून या तिसऱ्या हंगामात 27 ऑक्टोंबर 2021 ते 27 फेब्रुवारी 2022 या चार महिन्याचे कालावधीत 5 लाख मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळपाचा टप्पा कारखान्याने पूर्ण केलेला आहे. सदरचे 5 लाख मे. टन गाळप पूर्ण करणेस कारणीभूत ठरले आहे. सदरची बाब कारखान्याच्या अभिनंदनास पात्र ठरली आहे. अथर्व व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या आजअखेर गाळपास आलेल्या ऊसास एफआरपी पेक्षा जादा दर व वेळेत बील पेमेंट दिले आहे. यामूळे राज्यस्तरीय नांव लौकीकही या कारखान्यास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनीही कारखान्यावर विश्वास दाखवून कारखान्याच्या गळीतास ऊस पाठवला आहे. 

           तसेच वेळोवेळी कारखान्याच्या हिताच्या भुमिकेला पाठींबा यामध्ये शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, कामगार व्यक्त करुन व्यवस्थापनाला पाठबळ दिले आहे. यामध्ये शेतकरी, व अधिकारी व संलग्न घटकांची मोलाची साथ लाभली आहे. त्यामूळे कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पावधीत जास्तीत जास्त 5 लाखापेक्षा जास्त गाळप करुन सहा लाखापेक्षा जास्त इतके साखर उत्पादन घेतले आहे. तसेच डिस्टीलरीकडील अल्कोहोलचेही उत्पादन घेतले आहे. तसेच यापूढील जादा गाळप घेणेस व कारखान्याच्या माध्यमातून विविध प्रकल्प व उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment