अबब! माणगावमध्ये एका पट्याने तब्बल ९० माहिलांना दिला संजय गांधी योजनेचा लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2022

अबब! माणगावमध्ये एका पट्याने तब्बल ९० माहिलांना दिला संजय गांधी योजनेचा लाभ

संजय गांधी योजनेची ९० प्रकरणे मंजूर करून आणल्या बद्दल गुंडू मेटकूपी यांचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

              मनात तिव्र इच्छा असेल तर  कोणतेही  काम  करताना कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर करून काम करणारे अनेक सच्चे कार्यकर्ते आहेत. माणगांव (ता. चंदगड) येथेही गुंडू यलाप्पा   मेटकूपी या पट्याने अनेक अडचणींना सामोरे जात चंदगड मतदार संघामधील माणगांवमध्ये सर्वाधिक  म्हणजे तब्बल ९० महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देवून ' हम भी किसीसे कम नही, याची प्रचिती आणून दिली.

        संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी काम करण्याची संधी गुंडू मेटकूपीना मिळाली. या संधीचे सोने करत गावातील गल्लोगल्ली, घरोघरी फिरून अशा  वंचित लाभार्थी महिलांचा शोध घेतला. प्रशासनाकडे याचा वारंवार पाठपूरावा करत अशा ९० माहिलांची प्रकरणे मंजूर केली. यामुळे या सर्व महिलांचा आनंदाला पारावार उरला नाही. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या महिलांच्याकडून गुंडू मेटकूपी यांचा भव्य  सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पं. स. सदस्य अनिल सुरुतकर, उपसभापती सौ. मनिषा शिवनगेकर, सरपंच सौ. अश्वीनी कांबळे, ग्रा. पं. सदस्या सौ. पार्वती चिंचणगी, विठ्ठल पिटूक, पूतळा कमिटी अध्यक्ष  मारुती मेटकर, लक्ष्मण ससेमारी, बडकू पिटूक, यलाप्पा पिटूक, सुरेश अरळीकट्टी, आप्पाना मेटकूपी, शिवाजी पिटूक, मारूती चिंचणगी, युवराज चिंचणगी यांच्यासह महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment